देशाची प्रगती सर्वात महत्वाची- लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी):भाजप देशाची विचारधारा घेऊन चालणारा पक्ष आहे. प्रथम देश, नंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः अशी विचारसरणी असून सर्वांसाठी देशाची प्रगती सर्वात महत्वाची आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. २७)येथे केले. मुंबई गोवा महामार्गावर पनवेल तालुक्यातील शिरढोण गावाजवळ असलेल्या सुप्रसिद्ध अशा हॉटेल साईकृपेचे मालक आणि सामाजिक कार्यकर्ते जनार्दनशेठ वाकडीकर, जयेश वाकडीकर, हॉटेल एकवीराचे मालक श्यामशेठ वाकडीकर, मनोदय इंग्लिश स्कुलचे चेअरमन भगवान वाजेकर, महेश महाडिक, शंकर पवार, संतोष चौधरी, सुमित पवार, तुकाराम जळे, जितेंद्र जळे, अमर जळे, प्रविण म्हात्रे, चेतन कर्णेकर, दिनेश भोपी, यश भोपी, कृष्णा भोपी, रोशन महाडिक, जगदिश महाडिक, दीपक महाडिक, जयेश महाडिक, महेश हरिभाऊ महाडिक, पंढरीनाथ महाडिक, धनाजी चौधरी, अर्जुन भोपी, शरद भोपी, शरद भोपी, प्रविण भोपी, जनार्दन जळे, बाळाराम चौधरी, संतोष पाटील, राहुल पवार यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्ड येथे झालेल्या या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, युवा नेते प्रितम म्हात्रे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, वाहतूक संघटनेचे प्रभुदास भोईर, ऍड. राहुल घरत, अतुल घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, नगरसेवक विकास घरत, सरपंच राकेश गायकवाड, विश्वजित पाटील, माजी उपसरपंच प्रमोद कर्णेकर, विजय भोपी, श्याम पवार, अनंता भोपी, रोशन घरत, गिरीश मुकादम, गजानन घरत, राम वाजेकर, एकनाथ मुकादम, दत्ता मुकादम, मदन खारके, नारायण चौधरी, पांडुरंग चौधरी आदी पदाधिकारी आणि शिरढोण ग्रामस्थ उपस्थित होते.लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे मार्गदर्शन करताना सांगितले कि, भारतीय जनता पक्ष हा केवळ निवडणूक लढवणारा पक्ष नसून राष्ट्रसेवेचे ध्येय घेऊन कार्य करणारी संघटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकास, आत्मनिर्भरता आणि जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण केली आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला असून गरीब, शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरकारने केले असल्याचे त्यांनी नमूद केले. देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने कार्य केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत समाजसेवा आणि जनसंपर्काच्या माध्यमातून सर्वांनी एकजुटीने काम करावे, असेही ते म्हणाले. तसेच आज प्रवेश झाला आहे ते मंडळी आपल्या स्व:कर्तृत्वाने व्यवसायात यशस्वी झाले आहेत याचा मनापासून आनंद आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अधोरेखित केले. 


Post a Comment

0 Comments