पनवेल (प्रतिनिधी):पनवेल शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार दिनांक १२ रोजी दुपारी ३ वाजता कळंबोली येथे नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. या वेळी ते ‘व्हिजन २०३० पनवेल’ ही संकल्पना मांडणार असून पनवेलच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा नागरिकांसमोर सादर करणार आहेत.हा कार्यक्रम पनवेल महानगरपालिका मैदान, भूमी गार्डेनियासमोर, सेक्टर १९, प्लॉट सी/
२, कळंबोली येथे आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमुळे व पनवेलच्या भविष्यातील विकासदृष्टी मांडली जाणार असल्याने पनवेलकरांमध्ये मोठा उत्साहाचे वातावरण आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सिने अभिनेते प्रसाद ओक आणि सिने अभिनेत्री अमृता खानविलकर करणार आहेत.
0 Comments