पनवेल (प्रतिनिधी):भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल भाजपच्यावतीने अभिवादन करण्यात आले. भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक संतोष भोईर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, प्रीतम म्हात्रे, प्रकाश खैरे यांच्यासह कार्यकर्त्यानी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
0 Comments