रविवारी 'राज्यस्तरीय अटल करंडक' एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल(प्रतिनिधी) शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या १२ व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक ०७ डिसेंबरला सायंकाळी ०४ वाजता होणार आहे. या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा 'अटल करंडक' देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सव वर्ष असून या महत्वपूर्ण वर्षानिमित्त यंदा दोन रंगकर्मीचा 'गौरव रंगभूमीचा' पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. त्यानुसार ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. 
या सोहळ्याला सन्माननीय उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई प्रमुख कार्यवाह अजित भुरे, सुप्रसिद्ध अभिनेता जयवंत वाडकर, भरत सावले, सुप्रसिद्ध नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, अटल करंडक ब्रँड अँम्बेसिडर सुप्रसिद्ध अभिनेते सुव्रत जोशी, अभिनेते व दिग्दर्शक प्रमोद शेलार, प्रमोद अत्रे यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, दक्षिण मंडल अध्यक्ष मंगेश वाकडीकर आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
 त्याचबरोबर या दिवशी प्रसिद्ध मराठी अभिनेते, दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री त्यांच्या खास शैलीत बहारदार सूत्रसंचालन करणार आहेत. तसेच बक्षिस वितरण सोहळ्याच्या दिवशी हास्यजत्रा फेम अरुण कदम, श्याम राजपूत व चेतना भट त्याचबरोबर हास्य सम्राट विजेते प्रा. दीपक देशपांडे यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. या महाअंतिम फेरीच्या अनुषंगाने नाट्य एकांकिकांचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, अटल करंडक आयोजन कमिटीचे उपाध्यक्ष विलास कोठारी, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील आणि टीम अटल करंडक यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments