कामोठे : अभियंता प्रकोष्ट मंडळ अध्यक्षपदी सचिन यमगर यांची पुनर्नियुक्ती

पनवेल (प्रतिनीधी):पनवेल विधानसभा कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी कामोठे मध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अभियंता प्रकोष्ट मंडळ अध्यक्षपदी पुन्हा एकदा सचिन यमगर यांची फेरनिवड जाहीर करण्यात आली. ही बैठक भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, भाजप कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत मा . नगरसेवक रवींद्र जोशी तसेच कामोठे प्रभाग क्र.11 अध्यक्ष प्रदीप भगत व कामोठे मधील सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
या फेरनिवडीमुळे कामोठे भाजप संघटनेच्या कामकाजात अधिक ऊर्जा, गती व चैतन्य येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. फेरनिवडीनंतर प्रतिक्रिया देताना सचिन यमगर म्हणाले वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शन, आशीर्वाद व विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे. संघटनेच्या प्रत्येक कार्यात पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जनहितासाठी सदैव तत्पर राहू.

Post a Comment

0 Comments