उलवे, ता. ७ - ओम शेखर देशमुख या गव्हाण येथील तरुणाने लंडनमध्ये घवघवीत यश मिळविले आहे. त्याने एम. एसस्सी. इंटरनॅशनल बिझनेस ही पदवी डिस्टिंक्शनमध्ये पास होऊन मिळविली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी ओम देशमुखच्या लंडन येथील उच्च शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. ओम देशमुख याने ती सार्थ ठरविली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या कुणाल आणि सोनाली या मुलांनी लंडनमध्येच उच्च शिक्षण घेतले आहे. त्यामुळे आपल्या मुलांप्रमाणे ओम देशमुख याचेही उच्च शिक्षण लंडनमध्ये करण्याचा महेंद्रशेठ घरत यांनी निर्णय घेतला होता. ओम हा त्यांच्या वर्गमित्राचा मुलगा आहे. आपल्या मुलांप्रमाणे आपल्या वर्गमित्राचा मुलगाही लंडनमध्ये शिकविण्यासाठी पाठविणारे महेंद्रशेठ घरत हे बहुआयामी अवलिया आहेत. आजपर्यंत अनेक मुले दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची यशस्वी जबाबदारी महेंद्रशेठ घरत यांनी घेऊन पेलली आहे. अनेक मुलांना शिक्षणासाठी मदत करणे आणि शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊन नयेत म्हणून गव्हाण येथे यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलही सुरू केली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महेंद्रशेठ घरत हे उपेक्षितांचे आधारस्तंभ मानले जातात. ओम देशमुख हा गुरुवारी डिस्टिंक्शनमध्ये पास झाल्याचे समजताच महेंद्रशेठ घरत यांनाही अत्यानंद झाला. आपण दाखविलेला विश्वास सार्थ ठरविल्याबद्दल महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांनी ओम देशमुखचे अभिनंदन केले. सध्या त्याच्यावर एमजी ग्रुप आणि परिसरातील तरुणांचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 Comments