पनवेल,दि.20 : नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या आदेशानूसार महापालिका कार्यक्षेत्रातील खारघर, कामोठ्यातील रस्ते दुरूस्तीची कामे वेगाने सुरू केली आहेत. कामोठ्यातील सेक्टर 35 , सेक्टर 34, सेक्टर35, तसेच खारघरमधील तवा हॉटेल ते प्रणाम हॉटेल रोड, सेक्टर 21,सेक्टर 7 बालभारती रोड, केंद्रीय विहार रोड, रामशेठ ठाकूर शाळा परिसरातील रस्ते अशा विविध ठिकाणी रस्ते दुरूस्तीची कामे पुर्ण होत आहे.महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागातील रस्ते दुरूस्तीच्या कामास वेग आला असून अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे रोज या कामांचा आढावा घेत आहेत.
शहर अभियंता संजय कटेकर व कार्यकारी अभियंता सुधीर सांळुखे सातत्याने विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते दुरूस्तीच्या कामांना भेटी देऊन कामाचा आढावा घेत आहे. कनिष्ठ अभियंते आपल्या आपल्या प्रभागातील रस्ते दुरूस्तीची कामे रात्रंदिवस करीत आहेत.
सध्या कळंबोली मध्ये मार्ट समोरील रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू आहे. तसेच नवीन पनवेलमधील आदई तलाव परिसरातील रस्त्यांची दुरूस्तीची कामे पुर्ण होत आली आहे.
0 Comments