व्हॉईस ऑफ मिडिया इंटरनॅशनल फोरमला ISO 9001:2015 प्रमाणपत्राचा मान

प्रतिनीधी/पनवेल : पत्रकारिता आणि माध्यम क्षेत्रातील जागतिक स्तरावर सातत्याने कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मिडिया इंटरनॅशनल फोरम (VOM International Forum) या संस्थेला प्रतिष्ठेचे ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.या मान्यतेमुळे संस्थेच्या कार्याला आंतरराष्ट्रीय दर्जाची अधिकृत नोंद मिळाली आहे. हे प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय मानक प्रमाणन संस्था (International Standards Certification – ISC) तर्फे जारी करण्यात आले असून, ते Euro UK मान्यताप्राप्त आहे. प्रमाणपत्र क्रमांक QMS/230620/8599 असून, त्याचा वैध कालावधी १ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२८ असा असेल. पनवेलमधील खारघर येथील कार्यालयातून कार्यरत असलेली ही संस्था पत्रकार, मीडिया प्रतिनिधी तसेच जागतिक पत्रकार संघटनांना एकत्र आणण्याचे काम करते. पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा देणे, आंतरराष्ट्रीय पत्रकार नेटवर्किंग, जागतिक मीडिया भागीदारी, प्रशिक्षण व परिषदांचे आयोजन, मीडिया एक्स्चेंज कार्यक्रम आणि माध्यमांतून शांतता व लोकशाहीचा प्रसार या विविध उपक्रमांमध्ये ही संस्था आघाडीवर आहे.प्रमाणपत्र वितरणावेळी ISC चे अधिकृत प्रतिनिधी नंद कुमार यांनी स्वाक्षरी करून मान्यता दिली. तसेच प्रमाणपत्राची पडताळणी www.euroukals.org.uk या संकेतस्थळावर करता येणार असल्याचेही सांगण्यात आले.या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी आनंद व्यक्त केला. संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, ISO 9001:2015 प्रमाणपत्र आमच्या कामगिरीची आणि विश्वासार्हतेची अधिकृत नोंद आहे. पत्रकारिता क्षेत्रातील पारदर्शकता, गुणवत्ता आणि जागतिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू.
संस्थेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, ती विविध खंडातील पत्रकारांना एकाच मंचावर आणून ‘ग्लोबल मीडिया पार्टनरशिप’ निर्माण करण्यावर भर देते. तसेच पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी परिषदा, कार्यशाळा व विनिमय कार्यक्रम आयोजित करून अनुभवांची देवाणघेवाण साधते.

Post a Comment

0 Comments