पनवेल/ (प्रतिनिधी) : पनवेल विधानसभा मतदार संघांचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे चार कोटी 88 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि.15) झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये अनेक विकासाची कामे मार्गी लागत असून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे नितळस येथे तीन कोटी चार लाख 99 हजार रुपयांच्या निधीतून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत इजिमा 21 ते नितळस रस्ता काँक्रीटीकरण, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 16 लाख 86 हजार 434 रुपयांच्या निधीतून व्यायामशाळा तसेच पनवेल महापालिकेच्या एक कोटी 66 लाख 47 हजार 651 रुपयांच्या निधीमधून किरवली येथील भरत पाटील यांच्या घरापासून ते जितेंद्र तरे यांच्या घरापर्यंत आणि भरत पाटील यांच्या घरापासून ते मंदिरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या सर्व विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.या कामांच्या भूमिपूजनावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, एकनाथ देशेकर, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, नितेश पाटील, यतीन पाटील, चाहूशेठ पाटील, तालुका चिटणीस सचिन पाटील, विनोद पाटील, राम पाटील, बाळकृष्ण पाटील, दीपक उलवेकर, भास्कर आगलावे, राजेंद्र गोंधळी, शैलेश माळी, नासीर शेख, उल्हास पाटील, अशोक साळुंखे, राजेश पाटील, नवनाथ खुटारकर, कैलास मढवी, गुरूनाथ पावशे, बाळू काठे, रूपेश पावशे, दशरथ पावशे, धर्मा पावशे, बळीराम काठे, ग्रामपंचायत सदस्य दर्शना पावशे, सुमिता काठे, सुरेखा सांगडे, अरुण पाटील, सुनील पाटील, अनंता पाटील, कैलास गायकर, हरिश्चंद्र पाटील, गणेश पाटील, पांडुरंग पाटील, सदाशिव पाटील, भगवान पाटील, बबन भोईर, आयुष पाटील, मानव पाटील, यशवंत पाटील, नितेश पाटील, जयदेव गायकर, शक्ती तांडेल, रूपाली काठे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments