लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन; वावर्ले येथे रक्तदान शिबिर

पनवेल (प्रतिनिधी) :स्वकष्टाने मेहनत करून, समाजाचे काम करा, गोरगरीब जनतेला समजून घेऊन त्यांना मदत करा, आपल्या वयाने नाहीतर कार्याने आपली ज्येष्ठता सिद्ध करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वावर्ले येथे रक्तदान शिबिरावेळी केले. दानशूर व्यक्तिमत्व, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिर उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा खालापूर मंडळाच्या वतीने रविवारी खालापूर तालुक्यातील वावर्ले येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याशिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या शिबिरावेळी आमदार महेश बालदी म्हणाले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमिताने विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष रक्तदान शिबिरा बरोबर रोजगार मेळावा, महा रोजगार मेळावा, तसेच आदिवासी मुलांना शाळेत जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करून दिली असून आणखी एक बस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले तर या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
दर महिन्याच्या पहिल्या रविवारी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे.हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार असून, विशेषतः थैलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी आणि इतर गरजू रुग्णांसाठी या रक्तदान उपक्रमाचे मोठे योगदान ठरणार आहे. आतापर्यंत पनवेल, खारघर आणि खांदा कॉलनी येथे हे शिबिर यशस्वी आयोजन करण्यात आल्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी सांगितले.वावर्ले येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसादात लाभला. एम जी एम हॉस्पिटल कामोठे व सखा फाऊंडेशन मेडिकल पनवेल यांच्या सहयोगाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी आमदार देवेंद्र साटम, भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल मोरे, खालापूर मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे, खालापूर पूर्व मंडळ अध्यक्ष सानी यादव, माजी मंडल अध्यक्ष रामदास ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, ज्येष्ठ नेते अरुण पारठे, नितीन तवले, मनोज पारठे, निखिल पाटील, भरत मांडे, स्वप्निल ठोंबरे, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे, माजी सरपंच अरुण पारठे, प्रवीण जांभळे, गणेश कदम, गणेश मुकादम, प्रसाद पाटील, नागेश पाटील, प्रणित सांगळे, विशाल लोते, प्रसाद देशमुख, मयूर पाटील, विकास रसाळ, लवेश कर्णूक, राजेश पारठे, स्वप्नील पारठे, शहाजी पाटील, कृष्णा पारठे, मनोहर कडू यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

नागरिकांचा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
युवा नेते मनोज पारठे यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून शहाजी पाटील, रमेश भद्रिके, प्रदोष भद्रिके, स्वप्नील पारठे, महेश चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरामध्ये 77 जणांनी रक्तदान केले तसेच 200 हून अधिक नागरीकांनी आरोग्य तपासणी केली.

Post a Comment

0 Comments