भारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आनंद ढवळे

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचे, युवकांच्या प्रश्नांवरील संवेदनशीलतेचे आणि सतत लोकांमध्ये राहून केलेल्या कामांमुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. आनंद ढवळे यांनी पनवेल तालुका भाजयुमो अध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिले असून, त्यांच्या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. युवकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा त्यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय ठरला आहे.भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका अंतर्गत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आणि पक्षाच्या नियमानुसार जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी त्यांची नियुक्ती नुकताच जाहीर केली.'प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः' असे भाजपचे मूलमंत्र आहे. त्यामुळे या पक्षाच्या माध्यमातून आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी,जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर सतत समाजोपयोगी उपक्रमे राबविले जातात. त्याच अनुषंगाने युवा मोर्चाच्या माध्यमातूनही उपक्रमे आयोजित केली जातात. त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी आनंद ढवळे यांनी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वीरीत्या पार पाडली. त्याचबरोबर सतत जनसंपर्कात राहून लोकांची कामे करत राहणे हा त्यांचा चांगला गुण आहे. सातत्याने पनवेल, उरण या तालुक्यात त्यांनी काम केले आहे. तालुकाध्यक्ष पदावर काम करताना संघटनाला बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पनवेल व उरण तालुक्यात त्यांनी सातत्याने काम करत लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करत पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली असून, या नियुक्तीमुळे उत्तर रायगडमधील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निमित्ताने आनंद ढवळे यांनी पक्षश्रेष्ठींप्रती कृतज्ञता व्यक्त केली असून, “उत्तर रायगड जिल्ह्यातील युवकांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवणे, समाजोपयोगी उपक्रम राबविणे आणि पक्षाची विचारसरणी प्रत्येक युवकापर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय राहील,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Post a Comment

0 Comments