आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना चालना

पनवेल (प्रतिनिधी) : आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांना आपली मते प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी आणि वक्तृत्वकौशल्य विकसित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 'शाळा अंतर्गत फेरी' उत्साहात पार पडली.विद्यार्थ्यांनी माझं स्वप्न, शिक्षणाचं महत्त्व, स्वच्छ भारत, प्लास्टिक मुक्त भारत, मोबाईल नसते तर?, इंटरनेट – वरदान की शाप? अशा विविध विषयांवर जोशपूर्ण आणि प्रभावी भाषणे दिली. 
स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला, विचार मांडण्याची क्षमता सुधारली आणि स्टेज भीती कमी झाली. या फेरीतून प्रत्येक इयत्तेतून ३ विद्यार्थी पुढील अंतरशालेय फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी स्पर्धात्मक भावना निर्माण झाली असून पुढील फेरीसाठी उत्सुकता वाढली आहे. कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या पुढाकारातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असून शिक्षक, पालक आणि शाळा प्रशासन यांचा मोलाचा सहभाग लाभत आहे.

Post a Comment

0 Comments