पनवेल (प्रतिनिधी) दानशूर व्यक्तिमत्व, रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक चेअरमन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गव्हाण जिल्हा परिषद गट आणि उलवे नोड भारतीय जनता पार्टीच्या वतीने गणेशोत्सव तसेच गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील हजारो नागरिकांना मोफत गणपतीचा शिधा वितरित करण्याचा कार्यक्रम गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा तिथीनुसार अमृतमहोत्सवी वाढदिवस असल्याने मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल आणि गुलाबाचा महापुष्पहार घालून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पनवेल-उरण परिसरात वर्षभर विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. गुरुवारी त्यांचा तिथीनुसार अमृत महोत्सवी वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या संकल्पनेतून परिसरातील हजारो रहिवाशांना आणि गोरगरिबांना मोफत गणपतीचा शिधा वाटप करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, आपल्या जीवनात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, जनार्दन आत्माराम भगत आणि माता-पित्यांच्या संस्कार व आशीर्वादांमुळेच आपण घडलो आहोत असे सांगून सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या आणि भावी जीवन आनंदमयी व सुखी-समृद्ध होवो अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार महेश बालदी, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्राध्यापक डॉ. सदाशिवराव कदम आणि साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्राद्यापक डॉक्टर सदाशिवराव कदम, जे.के. जाधव, भाजपचे ज्येष्ठ जे.एम.म्हात्रे, भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, दिवंगत दि.बा.पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, रवीशेठ पाटील, भाऊशेठ पाटील, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाणच्या माजी सरपंच माई भोईर, माजी उपसरपंच विजय घरत, योगिता भगत, उषा देशमुख, कामिनी कोळी, नरेश मोकल, गणेश पाटील, सचिन घरत, माजी उपसरपंच अमर म्हात्रे, विश्वनाथ कोळी, जितेंद्र म्हात्रे, पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, गव्हाण विभागीय अध्यक्ष निलेश खारकर, धीरज ओवळेकर, वितेश म्हात्रे, शैलेश भगत, निकिता खारकर, भाऊ भोईर, राजेश म्हात्रे, मिनाक्षी पाटील, सुहास भगत, सुधीर ठाकूर, मदन पाटील, अनुप भगत, अंकुश ठाकूर, किशोर पाटील, सचिन राजे येरूणकर, अखिलेश यादव, अवधेश महतो, वहाळ पंचायत समिती भाजपा अध्यक्ष वितेश म्हात्रे, युवा मोर्चा गव्हाण विभागीय अध्यक्ष शनिकुमार पाटील, मंडळ उपाध्यक्ष सुहास गोंधळी, जयवंत देशमुख, हेमंत ठाकूर, रतनशेठ भगत, शैलेश भगत, मदन पाटील, दीपक गोंधळी, ॲडव्होकेट सुनिल मौर्या, मनोज मोर्या, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, सहायक विभागीय अधिकारी विजयराव जगताप, प्रिया शिंदे, संगीता कांबळे, अशा पाटील., अंकुश ठाकूर, अवनीश सिंह, रवी शिंदे, प्रणय कडू, नासिर खान, प्रतिश पाटील, निलेश खोत, विराज देशमुख, विनायक कोळी, समीर मढवी, देवालय मित्रा, गणेश पाटील, वनिता बाबर, अभिमन्यू दापोलकर, प्रवीण ठाकुर, हरी घरत, सागरशेठ ठाकुर, मुख्याध्यापक कारंडे सर, संतोष गुजर यांच्यासह सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
0 Comments