लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वकर्तृत्वाने जीवनाचे पान भरले - बाळासाहेब पाटील


पनवेल (प्रतिनिधी) सर्वसामान्यांच्या दुःखाशी जोडलेले राहणे, समाजकारणात पारदर्शकता ठेवणे आणि कोणत्याही परिस्थितीत सत्य बोलण्याची तयारी ठेवणे हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असून त्यांनी स्वकर्तृत्वाने जीवनाचे पान भरून ठेवले आहे, असे गौरवोद्गार कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांनी येथे काढले. गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उदघाटन भाजपचे ज्येष्ठ नेते व पनवेल नगरपरिषेदेचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर व कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत (दि. २३) येथे झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, प्रल्हाद केणी, पंडित शंकरराव वैरागकर, बंडाराज घाडगे, नंदकुमार पाटील, ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी, शंकुनाथबुवा पडघेकर, महादेवबुवा शहाबाजकर, सारेगम फेम जितेंद्र तुपे, इंडियन आयडॉल विजेता सागर म्हात्रे, भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, जे. टी. पाटील, संतोषबुवा पाटील, अध्यात्मिक समन्वय आघाडी कोकण संयोजक मोहन म्हात्रे, सुचिता वांजळे, आयोजन समितीचे पं. उमेश चौधरी, वसंतबुवा पाटील, पुनमताई ठाकूर, अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, नारायणबुवा पाटील, चंद्रकांत मने, जगदिश म्हात्रे, पवन राजे, शैलेश वाजेकर, विनोद तोडेकर, प्रसाद पाटील, सागर राजे, यांच्यासह भजन मंडळी उपस्थित होते. 
बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात म्हंटले कि, अशी काही व्यक्तिमत्व असतात जे कर्तृत्वाने इतकी मोठी असतात की त्यांचा वाढदिवस एक दोन दिवस नाही वर्षभर नाही पुढचं अख्ख आयुष्य साजरा केला तरी कमी पडते असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे ते असून त्यांचे हात गगनाला लागले तरी पाय जमिनीवर आहेत. आपली जुनी परिस्थिती न विसरता आज मी कितीही पुढे गेलो असलो जुने दिवस न विसरताना सगळ्यांचे दुःख जाणणारे असे ते आहेत. अशी काही व्यक्तिमत्त्व असते की त्यांच्या वाढदिवसाला काही लोकांना खेचून आणलं जातं तसं प्रेम निर्माण होतं कारण सच्चाई ज्यांच्या मनामनात नसानसात भरलेली आहे असे ते आहेत. भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणून मी गुणगान कौतुक करत नाही तर दुसऱ्या पक्षात असतातनाही विरोधक म्हणून कधीही त्यांच्यावरती बोट ठेवण्याची आम्हाला संधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली नाही. आयुष्यामध्ये राजकारणात किंवा समाजकारणात तीन गोष्टी आपण त्याला 'तीन सी' ज्याला म्हणतो कल्चर, कॅरेक्टर व करप्शन या तीन गोष्टींपासून सांभाळून वाटचाल करावी लागते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी क्लचरल म्हणून आपली संस्कृती सांभाळली, आणि कॅरेक्टरमध्ये इतक्या वर्षामध्ये चुकीचं काम त्यांनी केले नाही याचा साक्षीदार मी आहे आणि करप्शन दूर दूर पर्यंत करप्शनचं कुठेही नाव जोडला जाणार नाही असे लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत आणि अशा नेत्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा करणं म्हणजे आम्ही सगळे स्वतः भाग्यवान समजतो. पण मला जे थोडंसं जीवन कळलं त्याच्यामध्ये मला असे वाटते की हे जीवन जे आहे ते फक्त तीन पानाचे पुस्तक आहे. मला असं वाटतं की आपलं हे जीवन म्हणजे केवळ तीन पानांचं पुस्तक आहे. पहिले पान म्हणजे आपला जन्म जो ईश्वराने लिहून आपल्याला दिलेला असतो. तिसरे पान म्हणजे मृत्यू तो सुद्धा ईश्वराने आधीच निश्चित केलेला असतो. पण यामधील एक महत्त्वाचं पान आपल्या हातात असते ते म्हणजे मधले पान आपलं आयुष्य कसं घडवायचं, कसं जगायचं आणि काय मागे ठेवायचे हे ठरवणारे पान आहे. हे मधलं पान आपण कशा प्रकारे भरतो, यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाची किंमत ठरते. काही लोक हे पान रिकामं ठेवतात, काही साध्या ओळीत भरतात, तर काही थोर व्यक्ती आपल्या कर्माने, विचाराने आणि कार्याने हे पान सुवर्णाक्षरांनी भरून ठेवतात. अशा व्यक्तिमत्त्वाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर. त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने, लोकसेवेने, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याने जीवनाचे मधले पान अतिशय समृद्ध करून ठेवले आहे. त्यामुळे त्यांचं आयुष्य एक शिकवण आहे. या सोहळ्याचे प्रास्ताविक श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले. अध्यात्म महाराष्ट्राचे भूषण असून आपली संस्कृती संपूर्ण देशात पोहोचली आहे. राज्य सरकारने याची दखल घेत भांडवली अनुदान म्हणून १८०० भजन मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपये देण्याची घोषणा केली असून त्याबद्दल सरकारचे परेश ठाकूर यांनी आभार मानत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सातत्याने अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असून या पुढेही आयोजन करत राहणार आहे, असेही त्यांनी प्रास्ताविकात अधोरेखित केले. 
चौकट- 
महाराष्ट्र आपली संतांची भूमी आहे. भजनाची आवड निर्माण करण्याचे काम ज्येष्ठानी केले त्यामुळे युवक मोठ्या प्रमाणात भजन क्षेत्रात सहभागी आहेत. निवृत्तीबुवा चौधरी यांनी २५ वर्षांपूर्वी जिल्ह्यात भजनाची चळवळ उभारली आणि त्या चळवळीला चालना देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. - माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे 

Post a Comment

0 Comments