पनवेल : वाहतुकीच्या नियमाबाबत शालेय बस चालकांमध्ये
जनजागृती व्हावी या उद्देशाने पनवेल वाहतूक शाखेच्या हद्दीतील वाहतूक नियमानबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पाटील यांनी बस चालक व मुख्याध्यापक यांना वाहतूक नियमांबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन केले. सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन, अपघातांच्या घटनात वाढ होताना दिसून येत आहे अनेक वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्यामुळे अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले आहे म्हणून वाहतूक नियमांबाबत जनजागृती झाल्यास शिस्तप्रिय चालकाची संकल्पना स्पष्ट होईल. यामध्ये शाळेच्या गेटच्या दोन्ही बाजूस सीसीटीव्ही लावणे, स्कूल व्हॅन साठी ग्राउंड वर पार्किंग उपलब्ध करणे , स्कूल व्हॅन ना कुठे जाता- येतात त्याचप्रमाणे नंबर देण्याची व लांबचे विद्यार्थी यांना लवकरात लवकर जाण्याची सुविधा करण्याचे सूचना दिली. त्याचबरोबर शाळेच्या गेट व रस्त्यावर तुमचे वॉचमन शिक्षक P.T शिक्षक ठेवणे, वाहनाची कागदपत्रे अद्यावत असावीत वाहन चालकाने बॅच लावावा तो कुठून व कोणत्या विद्यार्थ्यांची वाहतूक करतो याबाबत शाळेने माहिती ठेवावी, शाळेचा टाइमिंग आपसात मीटिंग करून ठरवून घ्यावे जेणेकरून रस्त्यावर वाहतुकीची अडथळा होणार नाही. या जनजागृतीपर विशेष कार्यक्रमात पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी वाहतुकीच्या नियमाचे महत्त्व पटवून देतानाच अपघात कसे घडतात आणि अपघात कसे टाळता येऊ शकतात याचे मार्गदर्शन केले तसेच आपण स्वतः इतरांनी वाहतुकीचे नियम कसे पाळावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी पनवेल वाहतूक शाखा तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शालेय वाहन चालक तसेच संपूर्ण स्टाफ कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
0 Comments