
पनवेल (प्रतिनिधी) राज्य सरकाच्या योजना सर्वांपर्यत्त प्रभावी पर्यंत पोहचवण्याची जबाबदारी फक्त सरकारची नसून ज्यांना या योजनांचा लाभ मिळतो आहे, त्यांचीही ही जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांच्या माध्यमातून या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर ठाकूर यांनी पनवेल शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दाखले वाटप शिबीरावेळी केली. तसेच या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन दाखले वाटप कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल योजक डॉ. विलास मोहकर आणि माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहकर यांचे अभिनंदन करुन त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या वयाच्या ७५ वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त संपुर्ण वर्षभरात अमृत महोत्साव साजरा करण्यात येणार असून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल भारतीय जनता पार्टी आणि जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यामतून शासकीय दाखले शिबिर, आधार कार्ड आणि आयुष्यमान भारत योजने अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत विमा कार्ड शिबीराचे आयोजन डॉक्टर विकास मोहोकर आणि माजी नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहोकर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. हे शिबीर पनवेल शहरातील परदेशी आळीमध्ये आयोजित करण्यात आले. यामध्ये आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आयोग योजना, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना तसेच उत्पन्न, नॉन उत्पन्न प्रमाणपत्र, डोमेसाईल, नवीन आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, स्थानिक वास्तव्याचा प्रमाणपत्र तसेच इडब्ल्यूएस प्रमाणपत्र वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, लोकनेते दि.बा. पाटील यांचे सुपूत्र अतुल पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, माजी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, गणेश पाटील, अजय बहिरा, सुनिल बहिरा, माजी नगरसेविका सुरेखा मोहोकर, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, प्रिती जॉर्ज, अनुराधा ठोकल, सारीका भगत, पुष्पलता मढवी, भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, शहर सरचिटणीस अमित ओझे, डॉक्टर विलास मोहोकर, संजय मोहोकर, विजय मोहोकर, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या शिबीराचा लाभ अनेक नागरीकांनी घेतला.
0 Comments