आपत्कालीन सेवांबद्दल जागरूकतेसाठी अपोलोने लघुपट प्रदर्शित केला

नवी मुंबई, २७ मे २०२५: अपोलो हॉस्पिटल्सने आपत्कालीन प्रतिसाद दिनाचे औचित्य साधून एक विशेष लघुपट प्रदर्शित केला आहे. अपोलो हॉस्पिटल्सच्या सातत्यपूर्ण उपक्रमाचा एक भाग असलेल्या या लघुपटामध्ये महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. "उपचार तुमच्या दाराशी सुरू होऊ शकतात, मग गाडी का चालवायची?" या मोहिमेद्वारे, वर्तन बदलण्यास प्रोत्साहन देणे, आपत्कालीन परिस्थितीत आपल्या प्रियजनांना स्वतःच रुग्णालयात नेण्याची घाई करण्याऐवजी १०६६ वर कॉल करण्याचे आवाहन करणे, हे अपोलो हॉस्पिटल्सचे उद्दिष्ट आहे. स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा गंभीर दुखापतींसारख्या प्रकरणांमध्ये, वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. सुसज्ज रुग्णवाहिकेमध्ये तातडीने, जागेवरच वैद्यकीय उपचार सुरु केल्याने रुग्ण जगण्याची आणि तब्येत पूर्णपणे बरी होण्याची शक्यता लक्षणीय प्रमाणात वाढू शकते हे या लघुपटामध्ये अधोरेखित केले आहे. नॉन-लिनियर स्वरूपात सादर केलेला हा लघुपट दोन आपत्कालीन प्रतिसाद दृश्यांमधील तुलना दर्शवतो. पहिल्या प्रकरणात, रुग्णाला त्याचा मुलगा रुग्णालयात घेऊन जातो, त्यांना उशीर होतो आणि रुग्णाची प्रकृती बिघडते. दुसऱ्या दृश्यात, १०६६ वर कॉल केला जातो, एक प्रशिक्षित अपोलो आपत्कालीन टीम येते जी रुग्णालयात जाण्यापूर्वी तिथेच उपचार सुरू करते आणि रुग्णाची तब्येत चांगल्या प्रकारे पुन्हा पूर्ववत व्हावी यासाठी जास्तीत जास्त वेगाने रुग्णालयात घेऊन जाते.अपोलो हॉस्पिटल्स दरवर्षी ३,००,००० हून अधिक आपत्कालीन प्रकरणे हाताळते. अपोलो हॉस्पिटल्स हे भारतातील आपत्कालीन वैद्यकीय हेल्पलाइन - १०६६ सुरु करणारे पहिले रुग्णालय आहे. अपोलो हॉस्पिटल्समधील आपत्कालीन प्रतिसादामध्ये अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था, केंद्रीकृत समन्वय आणि कुशल वैद्यकीय पथक उपलब्ध आहे. सिंदूरी रेड्डी स्ट्रॅटेजी संचालक, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाल्या,"देशभरातील आमच्या रुग्णालयांच्या विस्तृत नेटवर्कसह आणि सुसज्ज रुग्णवाहिकांच्या ताफ्यासह, अपोलो हॉस्पिटल्स प्रोटोकॉलनुसार आपत्कालीन उपचार देण्यासाठी सज्ज आहे. काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या, आमच्या रिकव्हरी परिणामांमागे आमच्या अत्यंत कुशल वैद्यकीय पथकाचे प्रयत्न आहेत. अखंड समन्वयाने, आम्ही हे सुनिश्चित करतो की उपचार तुमच्या दाराशी सुरू होतील. हा लघुपट आपल्या सर्वांना आठवण करून देतो की वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत, १०६६ वर कॉल करणे हा तुम्ही घेतलेला सर्वात महत्त्वाचा निर्णय असू शकतो."
अपोलो रुग्णवाहिका प्रगत वैद्यकीय प्रणालींनी सुसज्ज आहेत, त्यामध्ये ईसीजी, हृदयाची गती आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन यासारख्या महत्वाच्या लक्षणांची नोंद केली जाते, तसेच रुग्णालयात नेताना व्हेंटिलेटर सपोर्ट देण्याची सोय आहे. या रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थिती आणि रुग्णालयात दाखल करण्याच्या मधला वेळ भरून काढण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये असलेल्या टीम्सना रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्वरित उपचारांसाठी तयारी करता येते. उच्च प्रशिक्षित आपत्कालीन कर्मचाऱ्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या, अपोलो रुग्णवाहिका आघात, हृदयरोग, मुलांना होणारे अपघात आणि प्रसूती यासारख्या जटिल वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींचे व्यवस्थापन करण्यास सक्षम आहेत. ही रुग्णवाहिका आल्या क्षणापासून रुग्णांना मदत करायला सुरुवात करते.

Post a Comment

0 Comments