पनवेल(प्रतिनिधी):- लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त केदार भगत मित्र परिवाराकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दिनांक 1 जून रोजी लोकनेते दि.बा.पाटील विद्यालयात हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर,माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे ,उद्योजक राजू गुप्ते,मंगेश परुळेकर हे उपस्थित राहणार आहेत.तसेच यावेळी दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा 1 लाखापर्यंत चा अपघाती विमा मोफत काढून दिला जाणार असल्याचे आयोजक भाजप पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांनी सांगितले.
0 Comments