उलवे, ता. 17 : सध्याचे केंद्र सरकार कामगार संघटनां नेस्तनाबूत करू पाहतेय, ब्रिटिश राजनिती अवलंबली जात आहे, तरीही कामगारांसाठी आम्ही लढणारच, नाहीतर गुलामगिरी सहन करावी लागेल. नवीन पोर्ट येतायत, पण मालक वर्गाच्या दादागिरीमुळे संघटनांना मर्यादा येतायत, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत मुंबई येथील आयटीफ परिषदेत म्हणाले.आयटीएफ नवी दिल्ली आयोजित कार्यशाळा मुंबईतील एमरार्ल्ड हाॅटेलात दिनांक 17 व 18 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. तिचे उदघाटन आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर म्हणून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महेंद्रशेठ म्हणाले, "चार लेबर कोड अंमलबजावणी विरोधात आंदोलन करावे लागेल. भारतातील बदलती अर्थव्यवस्था, गोदी बंदर वाहतूक, लाॅजिस्टिक सेक्टरमध्ये नवीन बदल येत आहेत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढणार आहेत. या लढ्याला बळ देण्यासाठी मी एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर म्हणून आयटीएफ लंडनकडून सल्लग्न संघटनांना पाठबळ देऊन अधिकाधिक मदत करण्यासाठी प्रयत्न करीन."यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी पी. एम. मोहमद हनिफा आणि पहेलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना, भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी आयटीएफ कार्यकारी मंडळाचे सदस्य तथा रेल्वे कामगारांचे नेते शिवगोपाल मिश्राजी, इंटकचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रप्रकाश सिंग, आयटीफ कोऑर्डीनेटर राजेंद्र गिरी,एसकेजीएमएस कांडलाचे मिश्राजी,माजी खासदार पूनम जाट यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळा शिबिरात देशभरातील SKGMS, NFIR, AIRF, RMS, TEU, KPKS, SUUWU, MBPT, TDWU, NMGKS यांसारख्या दहा बलाढ्य कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष पी. के. रामण, सरचिटणीस वैभव पाटील यांनी अनेक कामगार आमच्या संघटनेशी सल्लग्न होत असून महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वामुळे संघटना जोमाने काम करीत असल्याचे सांगितले. याकार्यशाळेत संघटनेचे संघटक लंकेश ठाकूर, अरुण म्हात्रे, महिला संघटक कल्पना ठाकूर, जयश्री भोईर यांनी सहभाग घेतला.
0 Comments