बेलापूर सहकारी ग्राहक संस्थेवर आमदार मंदाताई म्हात्रे यांचे “जय गणेश पॅनलची” सत्ता...

नवी मुंबई :- स्वातंत्र्यापासून कार्यरत असलेल्या बेलापूर सहकारी ग्राहक संस्था मर्यादित या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत “जय श्री राम पॅनल” चा धुव्वा उडवत आमदार मंदाताई म्हात्रे यांचे “जय गणेश पॅनल” बहुमतांनी निवडून आले. ६३ वर्षापूर्वी बेलापूर गाव, करावे, दारावे, दिवाळा, शहाबाज, फणसपाडा आणि आग्रोळी येथील नागरिकांनी एकत्र येऊन बेलापूर सहकारी ग्राहक संस्थेची स्थापना केली होती. स्थापनेपासून या संस्थेच्या संचालक आणि पदाधिकाऱ्यांची निवडणूक ही बिनविरोध होत होती. परंतु दि. १८/०५/२०२५ रोजी पार पडलेल्या निवडणुकीत आमदार मंदाताई म्हात्रे यांचे “जय गणेश पॅनल” बहुमतांनी निवडून आले. तसेच बेलापूर वासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे “जय गणेश पॅनल” चे निवडणुकीत उतरलेले सर्वच उमेदवार निवडून आल्याने आनंद व्यक्त करीत आहेत. याच अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधीपक्ष नेता पंढरीनाथदादा पाटील यांच्या निवासस्थानी “जय गणेश पॅनल” चे सर्व उमेदवारांचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पेढे भरवत अभिनंदन केले. यावेळी संचालक मंडळाच्या पार पडलेल्या निवडणुकीत “जय गणेश पॅनल” चे सर्व साधारण मधून उमेदवार रुपेश दिवेकर, भालचंद्र म्हात्रे, निलेश म्हात्रे, स्वप्नील म्हात्रे, मोहन मुकादम, दिनानाथ पाटील, प्रकाश पाटील, प्रसाद तांडेल, रतन तांडेल, महिला राखीव मधून प्रतिभा म्हात्रे, ज्योती पाटील तर इतर मागास प्रवर्ग राखीव मधून विश्वास भोईर, अनूसुचित जाती/ जमाती राखीव मधून जनार्धन भोईर आणि भटक्या विमुक्त जाती/ जमाती राखीव मधून अमेय मुकादम हे सर्व भरघोस मतांनी निवडून झाले.

Post a Comment

0 Comments