अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांची १७ मार्च २०२५ रोजी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तळोजा येथील कमळ गौरी हिरू पाटील शिक्षण संस्था बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय येथे के.जे.पी संस्थेच्या वतीने अत्यंत धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. यावेळी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना संपर्कप्रमुख बबन दादा पाटील यांच्या नेतृत्वात या महान उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात शिक्षण संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ढोल ताशा पथक व लेझीम पथक यांच्या गजरात सारा परिसर रंगला. तसेच या उत्सवाचे खास आकर्षण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशातील भूमिका केल्याने जयंतीला एक ऐतिहासिक व भव्य रंग प्राप्त झालेलं पाहायला मिळालं यावेळी रायगड जिल्ह्यतील वारकऱ्यांचे अध्यक्ष संत धनाची महाराज यांच्या हस्ते पूजन करून मिरवणूक काढण्यात आली .या मिरवणुकीत हरेश केणी, बाळा मुंबईकर, रामदास पाटील, कांती पाटील तसेच सर्व पक्षाचे कार्यकर्ते व तळोजा भागातील सर्व नागरिक, संपूर्ण ग्रामस्थ ,शाळेतील विद्यार्थी ,शिक्षक तसेच या भागातील बहुसंख्य मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सामील झाले यावेळी फेज वन येथील आऐशा हॉटेलचे मालक अफरोज शेख यांनी या मिरवणुकीत आलेल्या सर्व नागरिकांस अल्पोपहार व थंडपेय वाटप केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बबन दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाच आणि शिक्षण संस्थेतील सर्व सदस्यांच्या अथक परिश्रमांचा मोठा हातभार लागला. तळोजा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकत्र साजरी करून या कार्यक्रमाने सर्वांना प्रेरणा दिली.
0 Comments