टीआयपीएल प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट

पनवेल (प्रतिनीधी):- ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि.च्या सौजन्याने टीआयपीएल प्रीमियर लीग २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टीआयपीएल कर्मचाऱ्यांकरिता शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानात रंगलेल्या या स्पर्धेत १६ संघांचा सहभाग होता. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, अभिजित कडू, अरुण घरत, धनंजय करतुरी, एम.पी. त्यागी, भरणीकुमार चल्लागुल्ला, शशिकांत मुंबईकर, जगदीश घरत, अनिल देशमुख, अरुण नाईक आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments