भाजपा नेते सय्यद अकबर यांचा आ. प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ मॅन टू मॅन संवाद

 पनवेल (प्रतिनिधी ):- पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर हे सलग चौथ्या विजयासाठी तयार झालेले आहेत. समाजातील प्रत्येक स्तरांतून त्यांना पाठिंबा प्राप्त होतआहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदारांनी भाजपला आपलेसे केले नाही. यापासून बोध घेत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी मॅन टू मॅन प्रचारावर भर दिला आहे.  यांचे हे कार्य घराघरात घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.


          नुकताच पिंपरी चिंचवड येथे राहणारी निष्पाप मुलगी समरिन नेवरेकार  व तिची पाच आणि दोन वर्षाची निरागस मुले यांची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला कडक शासन करण्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत. अल्पसंख्यांक आयोग आणि महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून नराधमांना फाशीची शिक्षा आणि तिच्या कुटुंबीयांना समाधानकारक सांत्वन व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा मी एकमेव मुसलमान समाजातील नेता आहे. हे देखील मी प्रत्येक मतदाराला सांगत आहे.

     मीरा-भाईंदर महानगरपालिके अंतर्गत उत्तन येथे समुद्रकिनारी असणाऱ्या शेकडो वर्ष पुरातन हजरत सय्यद बाले पीर शाह बाबा दर्गा निष्कासित करण्यासंदर्भात काही समाजविघातक विकृतींनी षडयंत्र रचले होते. मुसलमान बांधवांसाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या रमजान महिन्यामध्ये दर्गा निष्काशीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यामुळे धार्मिक तेढ निर्माण करण्याचे समाजविरोधी शक्तींचे षडयंत्र होते. हे प्रकरण समजताच मी तातडीने ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. मूळ दस्तावेज आणि प्रत्यक्षदर्शी यांच्या माध्यमातून सदर दर्गा हा पुरातन आणि श्रद्धेचे स्थान असल्याचे त्यांना पटवून दिले. माझ्यामुळेच मुसलमान बांधवांच्या पवित्र धार्मिक जागेच्या निष्कासनाची कारवाई थांबलेली आहे.अशा कार्यातून भारतीय जनता पार्टी ही सदैव मुसलमान बांधवांच्या पाठीशी उभी असल्याचे दाखले मी जागोजागी देत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मते मिळणार यात जराही दुमत नाही. 
       बेताची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या मुसलमान कुटुंबांच्यामध्ये मी धार्मिक शिक्षणाच्या जोडीने आधुनिक शिक्षण घेण्यासाठी आग्रही राहत आहे. ज्या पद्धतीने आमच्या प्रचाराला प्रतिसाद मिळत आहे ते पाहता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सलग चौथ्या विजयामध्ये मुसलमान बांधवांच्या मतांचा सिंहाचा वाटा असेल. या प्रचार दौऱ्यामध्ये सय्यद अकबर यांच्या समवेत अल्पसंख्यांक मोर्चाचे पदाधिकारी साबीर शेख व नविद पटेल हे देखील अथक परिश्रम घेत आहेत. 
     पनवेल नवनाथ नगर वसाहतीमध्ये जरीना शेख, असमा शेख, नाहिद शेख,हिना शेख,आर्शिन शेख, कवसर शेख, फातिमा शेख, फातिमा अन्सारी या हिरीरीने सहभागी झाल्या होत्या. तर आजही येथे नेवाळी आदईचे शक्तिकेंद्र प्रमुख निलेश बाळाराम पाटील, कैलास पाटील, जरारअली खान,अमीर शेख सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments