शंकर वायदंडे अध्यक्षपदी; लोकशाही पत्रकार समितीची नवनियुक्त कार्यकारिणी व सदिच्छा भेटी

पनवेल, दि. १७ (वार्ताहर): लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रात निपक्षपाती, निर्भीड आणि मूल्याधिष्ठित काम करणारी नवी पिढी घडावी या उद्देशाने लोकशाही पत्रकार समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या निवड कमिटीने सा. रायगड सम्राटचे संपादक शंकर वायदंडे यांची अध्यक्षपदी निवड केली असून नवनियुक्त कार्यकारिणी मंडळाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
लोकशाही पत्रकार समितीच्या नवनियुक्त कार्यकारिणी मंडळाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. आमदार बाळाराम पाटील, मा. आमदार मनोहर भोईर, काशिनाथ पाटील, बबनदादा पाटील, सुदाम पाटील, शिरीष घरत, योगेश चिले तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आदी मान्यवरांनी समितीच्या अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अध्यक्ष शंकर वायदंडे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “असंघटित पत्रकारांनी लोकशाहीची मूल्ये जपत लेखणीचा वापर करताना कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्याय झाल्यास त्याला वाचा फोडल्याशिवाय शांत बसू नये. तसेच महिला पत्रकारांनीही कोणत्याही दडपशाहीला न जुमानता समाजातील अन्यायाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणे गरजेचे आहे.”या प्रसंगी लोकशाही पत्रकार समितीची संपूर्ण कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सनिप कलोते (कार्याध्यक्ष), शैलेश चव्हाण, गणपत वारगडा, अक्षय कांबळे (उपाध्यक्ष), सुनील वारगडा (खजिनदार), रोहिता साळुंखे (सह-खजिनदार), दिपाली पारसकर (सचिव), प्रेरणा गावंड (सह-सचिव), कृष्णा गायकवाड (प्रसिद्धी प्रमुख), आशिष साबळे (संघटक) तसेच प्रकाश मत्रे, जितेंद्र नटे, अजय दुबे व पद्माकर कांबळे (सदस्य) यांची निवड करण्यात आली.बैठकीत समितीच्या पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यात आली असून पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा, प्रशिक्षण उपक्रम, महिला पत्रकारांचे सबलीकरण तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारितेचा विस्तार करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments