रोडपालीत शेकापला जोरदार झटका; अनेक कार्यकर्त्यांचा समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल (प्रतिनिधी):पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोडपाली परिसरात शेतकरी कामगार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शेकापचे अनेक प्रमुख कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी भाजपच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त करत अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. रोडपाली परिसरात भाजपची ताकद वाढत असून येत्या महानगरपालिका निवडणुकीत याचा मोठा परिणाम दिसून येईल, असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments