चिपळे पूल ते नेरे रस्ता दुरुस्ती कामाला तातडीने सुरुवात - आमदार ठाकूर यांचा प्रयत्न यशस्वी

पनवेल (प्रतिनिधी) सिडकोच्या नैना प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चिपळे पूल ते नेरे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आजपासून सुरु झाले आहे. हा रस्ता दररोजची वर्दळ असलेला असून, यावरील मोठमोठे खड्डे आणि उखडलेल्या भागांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता या कामाला सुरुवात झाली असून प्रवासी नागरिक वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याकामी आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी आले आहेत. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा रस्ता सिडकोकडे हस्तांतरणानंतर नैना हद्दीत समाविष्ट झाला आहे. कायम वर्दळीचा रस्ता खराब झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांच्या मागणीला गांभीर्याने घेत सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना निवेदन दिले होते आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. या रस्त्याचे काम तातडीने सुरू झाले आहे. आमदार ठाकूर यांचा पुढाकारामुळे नागरिकांना आता सुरक्षित आणि सुकर प्रवासासाठी दिलासा मिळाला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.


Post a Comment

0 Comments