पनवेल (प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पनवेल तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे. शेकापचे गुळसुंदे विभाग माजी जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रविशेठ चोरघे, नांदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक ठोंबरे, शिवसेना ‘उबाठा’चे सांगुर्ली शाखाप्रमुख नितेश पारधी आणि युवासेना अधिकारी अनिकेत पाटील आदींनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांनी पक्षात स्वागत केले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जीवन म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य जगदीश पवार, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, पनवेल दक्षिण मंडल अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पश्चिम मंडल अध्यक्ष रूपेश धुमाळ, माजी नगरसेवक सुनील बहिरा, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, कृष्णा पारंगे, प्रवीण खंडागळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माध्यमातून होत असलेला विकास तसेच सक्षम कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन विविध पक्षांचे पदाधिकारी ‘कमळ’ हाती घेत आहेत. याच अनुषंगाने शेकापचे माजी जि.प. सदस्य राजू पाटील, माजी सरपंच रविशेठ चोरघे, उपसरपंच दीपक ठोंबरे, शाखाप्रमुख नितेश पारधी, युवासेना अधिकारी अनिकेत पाटील तसेच सोमाटणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय पाटील, सदस्य गंगाराम पाटील, नामदेव म्हस्कर, भावेश माळी, माजी उपसरपंच संजय डुके, माजी सदस्य अशोक पाटील, कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच अजित पाटील, वावेघर ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश चव्हाण, माजी सरपंच विनायक राठोड, माजी उपसरपंच नरेश भोईर, संतोष भोईर, माजी सदस्य अर्जुन कातकरी, चांभार्ली गु्रप ग्रामपंचायतीच्या सदस्य बेबी म्हात्रे, वावेघर ग्रामपंचायतीचे सदस्य भावेश माळी, शारुबाई चव्हाण, अध्यक्ष प्रेम चव्हाण, उपाध्यक्ष मोतिलाल पवार, खजिनदार रमेश चव्हाण, सुरेश पवार यांच्यासह तुरमाळे, सांगुर्ली, वावेघर, चांभार्ली येथील शेकाप आणि ‘उबाठा’च्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
0 Comments