पनवेल/प्रतिनीधी : कायमस्वरूपी नोकरी प्रथम प्रकल्पग्रस्त भूमिहीन भूमिपुत्रांना मिळावी, वाटपपत्र पाहूनच निर्णय घ्यावा ,कथित भाजप प्रणित नियोजित लोकांना प्रकल्पग्रस्त नसतानाही पहिल्या टप्प्यातील नोकरीत समावेश करून घेऊ नये असे सांगत अधिकृत वाटप पत्र प्राप्त १० गाव प्रकल्पग्रस्तांनी अदानी व BVG विरोधात जोरदार रणशिंग फुकलेले दिसत आहे . BVG या अदानी समूहाच्या संयुक्त कंपनी ने राजकीय हस्तक्षेप करून भरती प्रक्रियेत कामगारांची अंतिम निवड झाली तरी अजून मुख्य संचालक विमानतळ प्राधिकीकरण मंडळ अदानी समूहा कडे अधिकृत अंतिम यादी दिलेली नाही , सिडको मंडळाने हि यादी कायद्याने नियम अटी धरून तपासणी केलेली नाही. म BVG ने सप्टेंबर महिन्यात भरती प्रक्रियेतील कोणाला घेतले याबद्दल शंका व्यक्त करत आज मुंबई येथील BVG कार्यालयात विजय शिरढोणकर यांच्या शिष्टमंडळाने धडक देत बिपीन टिकू यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला .असता चर्चे अंती त्यांचा एक तर्फी भाजप समर्थनार्थ बोलणे, चालढकल पणा, अरेरावी,भेट नाकारणे आणि नोकरी प्रक्रियेतील बेजबाबदार पणे बाबतीत त्यांची नकारात्मक भूमिका संवादा मध्ये स्पष्ठपणे लक्षात येताच शिष्टमंडळाने त्यांची तक्रार BVG उद्योग समूह प्रमुख हनुमंतराव गायकवाड यांच्या कडे करणार असल्याचे सांगितले. प्रकल्पग्रस्तांना अदानीला समूहाच्या कायमस्वरूपी नोकरीत घ्यावे BVG या काँट्रॅक्ट मध्ये का ? बिपीन टिकू या प्रकल्पग्रस्त विरोधी अधिकाऱ्याला येथून बडतर्फ करा ,भरती प्रक्रिया यादी सार्वजनिक जाहीर करा त्यात राजकारण न पारदर्शकता ठेवा अशी विविध मागणी करून स्थानिक नेते विजय शिरढोणकर यांनी ठाम भूमिका घेत या लढ्याला अधिक तीव्र करण्याची इच्छा व्यक्त केली . यावेळी त्यांच्या सोबत शिष्टमंडळात किरण केणी ,निलेश भगत ,प्रवीण पाटील ,मोहन घरत ,मच्छिंद्र घरत, सचिन केणी,विशाल भोईर ,राहुल कोळी, सुधाकर कोळी आणि अन्य ग्रामस्थांनी आप आपल्या सूचना व्यक्त करत आंदोलनाची भूमिका लवकरच जाहीर करू असे सांगितले.
0 Comments