खारघर : राष्ट्रवादी पुरस्कार युवक व महिला मेळावा निलेश लंके प्रतिष्ठान यांच्यातर्फे दिनांक १७ जुलै रोजी खारघर येथील प्राईम मॉल येथे गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक महिला जिल्हा अध्यक्ष पनवेल राजश्रीताई कदम, जिल्हा उपाध्यक्ष हर्षल पाटील यांच्यामार्फत गरजू महिलांना चार महिने शिलाई मशीन चालवण्याचे शिक्षण देऊन त्यांना मशीन देण्यात आल्याचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले आणि त्यांच्या या कामाचे भरभरून कौतुक केले तसेच लाभार्थी महिलांना उद्योग धंद्यात आपली प्रगती कशी होईल, आपल्याला कशाप्रकारे उच्चांक गाठता येईल याबद्दल थोडक्यात माहिती दिली. सुप्रियाताईंच्या प्रत्येक व्याख्यानावर महिला वर्गांचा टाळ्यांचा कडकडात होत होता. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर रहमान सय्यद, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष शेट्टी, पवन गायकवाड, स्वप्निल काटकर, शहबाज पटेल, प्रशांत जाधव, श्रीमंत मोहिते, सागर पवार, कृष्णा मर्ढेकर, कल्पना माने, राजू मुलानी, मंथन कांबळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
0 Comments