गव्हाण विभागात विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

पनवेल (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे आणि आपल्या आई वडीलांचे, शाळेचे आणि आपल्या गावाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी गव्हाण विभागात वह्या वाटपांच्या कार्यक्रमावेळी केले.सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली तीस वर्षे उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप उलवे नोड यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण विभागातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आज (शुक्रवारी) संपन्न झाला. या अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या शिवाजीनगर, कोपर, शेलघर, बेलपाडा आणि गव्हाण कन्या आणि रायगड जिलहा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमाला पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊशेठ पाटील, रतनशेठ भगत, अनंता ठाकूर, गव्हाण विभाग अध्यक्ष अध्यक्ष निलेश खारकर, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, सुधीर ठाकूर, वामणशेठ म्हात्रे, विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच माई भोईर, माजी उपसरपंच विजय घरत, सचिन घरत, वहाळचे माजी उसरपंच अमर म्हात्रे, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या योगीता भगत, उषा देशमुख, हेमंत पाटील, भुषण म्हात्रे, श्री राममंदिर जिर्णोध्दार समितीचे अध्यक्ष महादेव कोळी, मच्छीमार को ऑपरेशन सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत कोळी, महिला मोर्चा अध्यक्षा निकीता खारकर, सुहास भगत, अजय भगत, विनायक कोळी, राजकिरण कोळी, वैभव घरत, रोशन म्हात्रे, राजेंद्र भगत, संतोष म्हात्रे, गणेश पाटील, अरिष पाटील, मधुकर पाटील, तुकारम ठाकूर, प्रकाश कडू, अशोक घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments