लोकनेते श्री.रामशेठ ठाकूर यांच्या जन्मदिन अमृत महोत्सवानिमित्ताने नाट्य महोत्सव

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळा राज्यभरात विविध सामाजिक लोक उपयोगी कार्यक्रमा मधून साजरा केला जातो .या निमित्ताने पनवेलकरांना त्यांच्या आवडत्या कलाकार रसिकांना व प्रेक्षकांना पाहता यावं तसेच मनोरंजन व प्रसन्नतापूर्वक वातावरणात आनंदाला द्विगुणीत करता यावं यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने सुप्रसिद्ध अशा दोन विनोदी नाटकांचे प्रयोग आद्य क्रांतिवीर वासुदेव फडके नाट्यगृहात विनामूल्य प्रवेशात दि. 2 जून २०२५ या दिवशी जगप्रसिद्ध नाट्यसम्राट प्रशांत दामले यांच्या अभिनयातील एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग सादर करून होणार असून यामध्ये सह कलाकार म्हणून कविता मेढेकर व अतुल तोडणकर असणार आहे .तर ०३ जून रोजी कुटुंब कीर्तन या लोकप्रिय नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे .अशा या सुंदर नाट्य महोत्सवाला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments