“कार्यसम्राट” आमदार महेंद्र थोरवे यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीची पुन्हा एकदा प्रचीती; मुद्रेकरांना मिळाले सुसज्ज वैकुंठधाम

कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा झपाटा सुरू असताना, मुद्रे ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देणारे एक महत्त्वपूर्ण कार्य नुकतेच पूर्णत्वास गेले आहे. उल्हास नदीच्या शांत किनारी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आणि सौंदर्यपूर्ण स्मशानभूमी – वैकुंठधाम – चे लोकार्पण आज शुक्रवार दिनांक 20 जून 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते मोठ्या भावनिक आणि सन्मानपूर्वक वातावरणात पार पडले. ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीची तात्काळ दखल घेत आमदार महेंद्र थोरवे यांनी स्मशानभूमीसाठी आवश्यक निधी मंजूर करून घेतला. कामांना गती देत अत्यल्प कालावधीत ही सुविधा जनतेच्या सेवेत उभी राहिली. पूर्वी अस्वच्छ, दुर्लक्षित आणि अपुरी सुविधा असलेली जागा आता सुसज्ज, सुशोभित आणि आदरयुक्त वातावरण निर्माण करणाऱ्या वास्तूत रूपांतरित झाली आहे. या स्मशानभूमीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तिचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवत सुयोग्य नियोजनात उभारणी. उल्हास नदीच्या काठावर असलेली ही वास्तू केवळ अंत्यसंस्कारासाठीची जागा नसून, माणसाच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यावरही त्याला सन्मान मिळावा, या भावनेतून उभी राहिलेली पवित्र जागा ठरते.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना नगरसेवक ॲड. संकेत भासे यांनी प्रकल्पाची वेळोवेळी पाहणी करून आवश्यक सुधारणा सुचविल्या. “ही केवळ स्मशानभूमी नाही, तर जीवनाचा शेवटही सन्मानाने पार पाडण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे ती टिकाऊ, सुंदर आणि सुविधा युक्त असणे आवश्यक होते,” असे ते म्हणाले. या लोकार्पणप्रसंगी आमदार  महेंद्र थोरवे यांनी भावनिक भाषणातून सांगितले की, लवकरच या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांसाठी छताखाली आसन व्यवस्था, सुरक्षिततेसाठी रेलिंग बसवण्याचे काम तातडीने हाती घेतले जाईल. निधी मंजूर करून थांबण्याऐवजी, कामाच्या बारकाव्यांपर्यंत लक्ष देणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका यानिमित्ताने अधोरेखित झाली. या कार्यक्रमास उपसभापती  मनोहर थोरवे, पत्रकार विजय मांडे, नगरसेवक ॲड. संकेत भासे, कर्जत शहरप्रमुख अभिषेक सुर्वे, उपशहरप्रमुख दिनेश कडू, शिवसेना शहर संघटक नदीम खान, युवासेना सचिव नाना कर्णूक,  दर्शन वायकर,  विशाल बैलमारे, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि मुद्रे व परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments