विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी मी सदैव तत्पर : महेंद्रशेठ घरत

उलवे, ता. १५ :  "विद्यार्थिनी शिकल्याच पाहिजेत, यासाठी मी १९९५ पासून सक्रियपणे काम करतोय. शिक्षणाला माझे नेहमीच प्राधान्य आहे. मुली चांगल्याप्रकारे शिकाव्यात यासाठीच गव्हाण-कोपरच्या विद्यालयात त्या काळी दहावी परीक्षा केंद्र सुरू केले. त्यामुळे तेथील मुली चांगल्याप्रकारे शिकू लागल्या. तेव्हापासूनच तेथील अल्पवयीन मुलींचे लग्न होण्याचे प्रमाण थांबले. ही माझ्यासाठी खूप मोठी कमाई आहे. आज विद्यार्थिनींनी शिकून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सर्व समालोचक पुढे आलेत, ते चांगले काम करत आहेत. मी त्यांच्या या कामात नेहमीच अग्रेसर असेन. समाजहितासाठी झटणाऱ्या संस्थांना माझे कायमच पाठबळ असेल. आता ५१ हजार दिलेत. यापुढे विद्यार्थिनी वाढतील, तसाच मी मदतीचा ओघ वाढवेन. विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी मी सदैव तत्पर आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनो, तुम्ही भरपूर शिका, मात्र आई-वडिलांना कधीही विसरू नका," असा सल्लाही आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी विद्यार्थिंनींना मार्गदर्शन करताना चिर्ले येथील श्रीराम मंदिरात दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्रशेठ होते.उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनतर्फे गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी शैक्षणिक अर्थसाह्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत गरजू विद्यार्थिनींना मदत म्हणून महेंद्रशेठ घरत यांनी ५१ हजारांची आर्थिक मदत केली. त्याबद्दल आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काॅंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी इतरही देणगीदारांनी शक्य ते सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले.vयावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक ठाकूर म्हणाले, "महेंद्रशेठ यांच्यात लढा उभारण्याची क्षमता आहे. ते लढाऊ आणि सामाजिक भान ठेवून काम करतात. उरण परिसरातून मोठा निधी शासनाला जातोय, पण दि. बा. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज अद्याप होत नाही, हे दुर्दैव आहे." यावेळी उपसरपंच श्रीकांत पाटील, शेकाप नेते सुनील मढवी, धुतूम ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ ठाकूर, जासई माजी सदस्य मुरलीधर ठाकूर, जसखार ग्रामपंचायत सदस्य हेमंत ठाकूर, माजी ग्रामपंचायत सदस्य कोप्रोली चंद्रशेखर ठाकूर, वैद्यकीय अध्यक्ष चैतन्य पाटील, अॅड. निग्रेस पाटील,  गोपीनाथ म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते मयूर म्हात्रे, रायगड जिल्हा इंटक सरचिटणीस विवेक म्हात्रे, मनीषा घरत, रायगड भूषण नितेश पंडित, रायगड भूषण पपन पाटील, उरण विधानसभा युवक इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, काँग्रेस नेते जितेंद्र पाटील,उरण समालोचक अध्यक्ष प्रसाद भोईर, उपाध्यक्ष विपुल पाटील, तसेच असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य, विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments