
पनवेल : पनवेलमधील नेहमीच महिलांसाठी कार्यरत असणारी एकमेव संस्था ती म्हणजे क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन होय. महिलांना न्याय आणि सन्मान मिळवून देणारी ही संस्था असून संस्थापक/अध्यक्षा सौ.रुपालीताई शिंदे यांनी दि.१२ मे २०२५ रोजी जागतिक परिचारिका दिनानिमित्त क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे परिचारिकांचा छोटेखानी कार्यक्रम घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रत्येक रुग्णाशी कसलाही दुजाभाव न करता शुश्रूषा करत आहेत. सध्या रुग्णांच्या सगळ्यात जवळची नातेवाईक ही परिचारिकाच असून,त्या 'सिस्टर' या नात्याने पूर्ण सेवा देत आहेत. ह्या नारी शक्तींना त्यांच्या सन्मानप्रीत्यर्थ त्यांना केक कापून व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम निकम परमार हॉस्पिटल याठिकाणी डॉक्टर माळी यांच्या सहकार्याने परिचारिका अश्विनी पाटील, दुर्गा पाटील, कुमारी स्नेहा, सीमा, ममता मावशी आदी परिचारिकांना फॉउंडेशनच्या अध्यक्षा रुपालीताई शिंदे यांच्या हस्ते जागतिक परिचारिका दिनाचे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा या खास दिनी सन्मान करण्यात आला. क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या कारंजाडे अध्यक्षा स्नेहा धुमाळ आणि अश्विनी पाटील यांनी अथक मेहनत घेतली. यावेळी सर्व परिचारिका व इतर स्टाफ भारावून गेले होते. त्यांनी रुपाली शिंदे व त्यांच्या सदस्या यांचे मनभरून कौतुक केले व आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संम्पन्न करण्यात आला.
0 Comments