पनवेल (प्रतिनिधी) ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दशहतवादी अड्डे उध्वस्त करून पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवला. भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ राष्ट्रीय एकता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ पनवेल भाजपतर्फे रविवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ९ वाजता 'भव्य तिरंगा यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. या तिरंगा पदयात्रेला पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात होणार आहे. यामध्ये नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments