पनवेल ( प्रतिनिधी):- उत्तर रायगड जिल्ह्याची बैठक पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, चारुशीला घरत, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, उरण मंडल अध्यक्ष रवी भोईर, खालापूर अध्यक्ष प्रवीण मोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी, विविध मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष व सरचिटणीस, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, संघटन पर्व पदाधिकारी उपस्थित होते. वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याबद्दल देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्या अभिनंदनाचा या बैठकीत ठराव मांडण्यात आला. त्याला सर्व उपस्थितांनी अनुमोदन देत टाळ्यांच्या कडकडाट आनंद व्यक्त करण्यात आला. बैठकीत यावेळी संघटन पर्व आढावा, स्थापना दिवस कार्यक्रम, संघटनात्मक निवडणुक, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत चर्चा विनिमय झाले.
0 Comments