महेंद्रशेठ घरत यांचा कामगारांनी केला सत्कार!

उलवे, ता. 19 : महेंद्रशेठ घरत हे गरीब आणि गरजू तरुणांना रोजगार देण्यासाठी नेहमी पुढाकार घेतात. गरिबांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. दरवर्षी सुमारे पाचशे तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवणारा नेता म्हणून महेंद्रशेठ घरत यांची ख्याती आहे. नुकताच त्यांच्या माध्यमातून शिरढोण येथील जे.डब्ल्यू.सी हबमध्ये स्थानिक 20 तरुणांना रोजगार मिळाला. तरुणांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटल्यामुळे त्या तरुणांनी किरण कुंभार यांच्यासोबत शेलघर येथील 'सुखकर्ता' बंगल्यावर आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची भेट घेऊन शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महेंद्रशेठ घरत यांनी रोजगार दिल्याबद्दल स्थानिक कामगारांनी त्यांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments