कर्नाळा अभयारण्यात प्राण्यांच्या सरंक्षणासाठी लावलेले लोखंडी पत्रे चोरताना टेम्पो पकडला...

पेण-दि.२७ (देवा पेरवी) :- अनेक वर्षांच्या लढ्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचे उत्कृष्ठ दर्जाचे काम सुरू आहे, मात्र सध्या याच महामार्गावर चोरांचा सुळसुळाट आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य येथे माकडं व इतर प्राणी रस्त्यावर येऊ नये म्हणून सदर प्राण्यांच्या संरक्षणासाठी उंच लोखंडी पत्रे बॉक्स लावण्यात आले आहेत. आणि त्या पत्र्यांमुळे अनेक प्राण्यांचे सरंक्षणही होत आहे. मात्र गुरुवारी दि.२७ मार्च च्या रात्री २ च्या सुमारास मुंबई हुन पेण च्या दिशेने काही तरुण जात असताना एम. एच ४६ बी. एम ०४७४ क्रमांकाच्या टेम्पो मध्ये सदर लोखंडी पत्रे बॉक्स चोरत असल्याने निदर्शनास आले. यावेळी सदर जागृत तरुण गाडी थांबवून पत्रे का चोरता हे विचारायला गेल्यावर आणि तात्काळ पनवेल पोलिसांना मोबाईल वरून संपर्क करत असताना झालेल्या झटापटीत टेम्पो मधील 3 जणांनी हाताला झटका देत व दाट अंधाराचा फायदा घेत संरक्षण भिंतीवरून उडी मारून जंगलाच्या दिशेने पसार झाले. 
त्यानंतर सदर तरुणांनी १०० नंबर संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली असता काही वेळाने निर्भया पथकाचे पोलीस कर्मचारी शिल्पा कवी व धनंजय पाठारे घटनास्थळी दाखल झाले असता सदर चोरीतील लोखंडी बॉक्सने भरलेला टेम्पो, चावी व मोबाईल रात्री ३.३० वाजता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. चोरीतील तिन्ही आरोपी जरी फरार असले तरी लोखंडी पत्र्यांनी भरलेला टेम्पो मात्र पोलिसांच्या ताब्यात आहे. सदर कर्नाळा अभयअरण्यातील प्राण्यांच्या सरंक्षणासाठी लावण्यात आलेल्या शेकडो लोखंडी पत्रे बॉक्स चोरीला गेल्याचे दिसत आहे.


Post a Comment

0 Comments