पनवेल:- विद्यार्थांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण कारण्यासाठी तसेच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी सेवा सहयोग फॉउंडेशन मार्फत पनवेल येथील राकेश जैन हायस्कूल, शिवकर येथे विज्ञान प्रदर्शन दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधिकारी रायगड संदीप वारगे सेवा सहयोग फॉउंडेशनचे संचालक सुधीर पटेल , डब्लू. एन. एस. केयर्स फाऊंडेशन चे सिनियर जनरल मॅनेजर मुक्ता ढवळे, सिनियर ग्रुप मॅनेजर शेरल डीकोस्टा, ग्रुप मॅनेजर रसिका गुंजल , सिनियर एक्झिक्युटिव्ह रेगी नायर, पोलिस निरीक्षक संजय पाटील, मुख्याध्यपक सुरेश ढवळे आणि शाळेचे संस्थापक लक्ष्मण पाटील हे उपस्थित होते. परीक्षक म्हणून शशिकांत जाधव, रामहरी म्हस्के, उल्हास गावंड, रवींद्र अर्डक, सत्यवान शिंगाडे हे लाभले होते. सेवा सहयोग फॉउंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर अभिनंदन साह यांनी सेवा सहयोग फॉउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि परीक्षकांनी प्रकल्पाची पाहणी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रदर्शनामध्ये पनवेल, नवी मुंबई आणि पेण या भागातील एकूण ५६ शाळांमधील २०० विदयार्थ्यांनी आपले प्रयोग प्रदर्शनात सादर केले .२३०० हुन अधिक विदयार्थ्यांनी व ८६ शिक्षकांनी या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेतला.या एकदिवसीय विज्ञान प्रदर्शनात विज्ञान प्रयोगाचे डी. आय. वाय. ऍक्टिव्हिटी, फूट रॉकेट, फायर रॉकेट, टेलिस्कोप द्वारे सूर्यदर्शन, यांसारखे बरेच उपक्रम हे सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरले. अधिकाधिक मुलांना या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी वेगवेगळ्या शाळांमधून बसद्वारे मुलांना प्रदर्शनाच्या ठिकाणी आणण्यात आले. या स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना डब्लू. एन. एस. चे पदाधिकारी आणि सेवा सहयोग फाउंडेशन चे संचालक सुधीर पटेल या पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. सेवा सहयोग फॉउंडेशन चे कार्यकर्ते, पिल्लई महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी तसेच शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या सहकार्याने विज्ञान प्रदर्शनाचे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
0 Comments