पनवेल न्यायालय नवीन इमारत येथे भाषा गौरवदिन संपन्न


(उरण : प्रतिनीधी) अधिवक्ता परिषद पनवेल यांचे तर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ साहित्यिक एल बी पाटील, उरण यांच्या व्याख्यानाचे आयोजन बार रूम पनवेल येथे केले होते. यावेळी व्यासपीठावर अधिवक्ता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज भुजबळ ,महामंत्री सुनील तेलगे ,तालुका महामंत्री अस्मिता भुवड , नवी मुंबई युनिटचे अध्यक्ष विशाल जाजु,सरकारी वकील थळकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. अधिवक्ता नूतन केणी यांनी सूत्रसंचालन केले. आयुष्यात प्रथमच सूत्रसंचालन करत असताना देखील त्यांनी अतिशय उत्तम रीतीने त्यांची जबाबदारी पार पाडली.अधिवक्ता नागेश हिरवे यांनी खणखणीत आवाजात प्रस्तावना व वक्ता परिचय करून दिला. तर अस्मिता भुवड यांनी आभार प्रदर्शन केले. उरणचे सुपुत्र तथा जेष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळचे सदस्य प्राध्यापक एल बी पाटील यांनी त्यांच्या मुख्य भाषणामध्ये मराठीतील बोली भाषांचे महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराज यांचा उज्ज्वल इतिहास व आगरी बोलीतील कविता,समाजाचे प्रश्नांबद्दल प्रबोधन अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करीत मराठी भाषेचे महत्व जोरकसपणे पटवून दिले. त्यांचेनंतर अधिवक्ता मनोज भुजबळ व थळकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला वकिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाला नवी मुंबईहून जाजु सर व त्यांचे सहकारी आणि अलिबाग महामंत्री निकेत चवरकर यांची उपस्थिती होती .माजी न्यायाधीश श्री.हवेलीकर हेही उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. जिल्हा महामंत्री सुनील तेलगे व जिल्हा कार्यालयीन मंत्री मनोज म्हात्रे यांच्या प्रेरणेतून व तीव्र इच्छाशक्तीतून सदर कार्यक्रम घडून आला.कार्यक्रम उत्तम रित्या पार पाडल्याने सर्वांनी अधिवक्ता परिषदेच्या पनवेल युनिटचे मनापासून अभिनंदन करत व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments