कळंबोली:- कै. रघुनाथ आंबेरकर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दि. ९ फेब्रुवारी रोजी कळंबोली मोठ्या दिमाखात पार पडला. सदर संस्था गेली आठ वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. सदर संस्थेच्या मुख्य उद्देशांपैकी एक म्हणजे दिव्यांगांचे शिक्षण, आणि त्यातील एक घटक म्हणून हा सोहळा पार पडला. तसेच समाजातील घटकांपैकी महिलांसाठी व मुलींसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास समाजसेवक नितीन पगारे, गौरव पौरवाल, सचिन झणझणे, शितल माळवे, कविता हांडे , ज्ञानेश्वर बनगर (नृत्य दिग्दर्शक) आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेच्या अध्यक्षा माधुरी पंडित-आंबेरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. विशेष मुलांच्या (कर्णबधिर, मतिमंद) नृत्य स्पर्धेत रोनित पाटील प्रथम क्रमांक, कु. प्रणिती जाधव द्वितीय, तर शाहिद शब्बीर हा तृतीय आला. दूसरी नृत्य स्पर्धा महिलांसाठी होती. यात चेंबूरच्या किर्ती कांबळे प्रथम, अंकिता पांडे द्वितीय तर आरती दणगट या तृतीय आल्या. महिलांसाठी प्रथम क्रमांक आलेल्या महिलेला शितल माळवे यांच्याकडून एक ग्रॅम ज्वेलरी चा हार, तर द्वितीय क्रमांकासाठी कविता हांडे यांचेकडून सोन्याची नथ, व तृतीय क्रमांकाला मानाची पैठणी देण्यात आली.
मुलींच्या वयोगटात स्वरा पाटील प्रथम, आर्या शेळके द्वितीय तर आर्या लोखंडे तृतीय यांनी क्रमांक पटकावले.
या सर्व स्पर्धांचे परिक्षण लावणी सम्राट, नृत्य दिग्दर्शक ज्ञानेश्वर बनगर व त्यांचे सहकारी कल्पेश दमडे यांनी केले. सदर सोहळ्यास शिक्षिका पुष्पा डहाळे व पालक वर्ग, संदीप काटे यांचे विशेष सहकार्य लाभले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे खजिनदार अमोल आंबेरकर यांनी केले.
0 Comments