खालापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नीलेश ठोंबरे यांची `टेंभरी’ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

[उलवे नोड, ता. २२] : खालापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आणि आसरोटी गावचे तरुण नीलेश सीताराम ठोंबरे यांची `टेंभरी’ ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बुधवारी (ता. २२) बिनविरोध निवड झाली. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी नीलेश ठोंबरे यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि जय शिवराय पुस्तक भेट देऊन अभिनंदन केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि `टेंभरी’ ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश गायकवाड, तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.    

यावेळी नीलेश ठोंबरे म्हणाले, ``माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो मी सार्थ ठरविणार. ग्रामपंचायत हद्दीतील गावांच्या विकासाकडे लक्ष देईन. मी महेंद्रशेठ घरत यांच्यामुळेच उपसरपंच झालो आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.’’ यावेळी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल डवळे, ज्येष्ठ नेते विनायक देशमुख, माजी सरपंच शरीफ बालदार, देविदास म्हात्रे, विनायक डवळे, प्रशांत खाणे, राजू कापरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments