प्रतिनिधी:- नवी मुंबई
नैसर्गिक नदी, नाले ,जमीन सुरक्षित रहावे या दृष्टिकोनातून अनेक कायदेशीर बाबी ध्येय धोरण असतानाही A G अष्टविनायक पेट्रोल केमिकल लिमिटेड सारख्या कंपन्यांकडून बिटूमीन इम्पोर्ट करून त्यातून अनेक वेगवेगळे वस्तूंचे उत्पादन करत असल्याची माहिती समोर येत आहे .भेसळयुक्त डीजल उत्पादन करून बेकायदेशीर रित्या उत्पादन, विक्री करणे तसेच हानिकारक वेस्टेज केमिकल जिल्ह्यातील नदी नाल्यांमध्ये सोडून प्रदूषण करणे अशा प्रकारच्या गैर व बेजबाबदार घटना कंपनी व्यवस्थापना कडून ५ ते ६ वर्षांपासून होत असल्याचे निर्देशनास आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग कोकण विभाग संघटक संजय तन्ना यांनी महाराष्ट्र पोलुशन कंट्रोल बोर्ड नवी मुंबई येथे लेखी तक्रार द्वारे निवेदन करीत कन्स्टंट टू ऑपरेट ची परवानगी त्वरित रद्द करावी अशी A G अष्टविनायक पेट्रोल केमिकल लिमिटेड विरोधात तक्रार केली आहे .सदर प्रकरणी अनेक तक्रारी समोर येत असल्याने मनसेने या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी व प्रदूषण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत आहे . MPCB ने तातडीने कारवाई न केल्यास मनसे स्टाईलने प्रकरण हाताळले जाईल अशी सूचना वजा इशारा ही दिला असल्याचे समजत आहे.
0 Comments