कर्जत - तालुक्यातील शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि १८५७ चे स्वातंत्र्य सेनानी नानासाहेब पेशवे स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नानासाहेब पेशवे यांचा २०० वा जयंती सोहळा रविवार ८ डिसेंबर २०२४ रोजी महालक्ष्मी देवस्थान मु. वेणगाव, कर्जत या ठिकाणी ट्रस्टच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रमुख वक्ते मा. अविनाश धर्माधिकारी (माजी सनदी अधिकारी) नानासाहेब पेशवे यांच्या गावी आल्यानंतर या ठिकाणाच्या हवेतून अतिशय चांगली स्पंदने निर्माण होतात नानासाहेब पेशवे यांनी आपल्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी खूप मोठे योगदान दिले ते शेवटपर्यंत इंग्रजांच्या हातामध्ये सापडले नाहीत त्यांनी केलेले हे महान योगदान आपल्या सर्वांना वेगवेगळ्या मार्गाने पुढे घेऊन जायचे आहे हीच त्यांच्या कार्याची प्रेरणा ठरेल. कार्यक्रम प्रसंगी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नानासाहेब पेशवे यांचे 1857 स्वातंत्र्य लढ्यातील योगदान खूप महत्त्वाचे आहे अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्मभूमी म्हणून रायगड कडे पाहिले जाते, याच रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर तालुक्यामध्ये अनेक रत्ने जन्माला आले यामध्ये हुतात्मा हिराजी पाटील , हुतात्माभाई कोतवाल व वेनगाव येथील जन्मलेले नानासाहेब पेशवे हे एक आहेत. 1857 च्या उठावामध्ये नानासाहेब पेशवे यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी संपूर्ण भारत भर हा उठाव केला हा उठाव जर चांगल्या प्रकारे यशस्वी झाला असता तर भारताला 1857 लाच स्वातंत्र्य मिळाले असते. नानासाहेब पेशवे हे या भूमीचे सुपुत्र आहे. याचा आम्हा कर्जतकरांना अभिमान आहे. नानासाहेब पेशवे यांचे राष्ट्रीय स्मारक वेणगाव या ठिकाणी उभारले जाईल व यासाठी आवश्यक असलेला सर्व खर्च राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असा शब्द दिला तसेच या राष्ट्रीय स्मारकासाठी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून 3 ते 5 एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल.
0 Comments