पनवेल/करंजाडे:-
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उद्भवणाऱ्या अनेक अडीअडचणी व तक्रारी आल्यानंतर करंजाडे ग्रामपंचायतच्या अतिक्रमण विभागाने मागील आठवड्यात तोडक कारवाई केली होती. अत्यंत महत्वाची तक्रार असताना सोमवारचा आठवडा बाजार बेकायदेशीर रित्या कायद्याचा अंकुश न ठेवता बिनधास्त पणे थाटला गेला. आठवडी बाजार चालवणाऱ्या टोळी कडून वरदहस्त असल्याने कैसा डर ..असे म्हणत अनेक फेरीवाले भर रस्त्यावरच ठिय्या मांडून बिनधास्त बसल्याने मागच्या वेळीची केलेली कारवाई ही का फक्त औपचारिकता होती का? असा सवाल जनते कडून ऐकायला मिळत आहे. कारवाई करण्यासाठी आलेले करंजाडे ग्रामपंचायत अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी यावर कठोर पाऊले उचलावीत व जनतेचा विश्वास संपादित करावा, अन्यथा सर्वांना अतिक्रमण करण्याची परवानगी द्यावी अशी भावना दुखावलेल्या मनानं व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. करंजाडे ग्रामपंचायत मूलभूत सेवा सुविधा ,सुरक्षितता देण्यासाठी कटिबद्ध असताना ही जर अनधिकृत आठवडा बाजार संस्कृती अश्या बेकायदेशीर पध्दतीने उघडपणे होत असेल तर सर्व सामन्य नागरिकांनी कोणाची अपेक्षा करावी असा प्रश्न उद्भभावला जात आहे . अतिक्रमणे करण्याऱ्या हातगाड्यांच्या रूपाने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून परिसरात बेकायदेशीर घटना, घात पात,चोरी, गुंडगिरी असा कुठलाही प्रकार घडू शकतो अशी भीती नागरिकांनी व व्यापारी वर्गाने व्यक्त केली . कायदेशीर नियम पाळल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने अश्या गैर प्रकारावर कठोर कारवाई कारायला हवी अशी सर्व सामान्य करंजाडेकरांची इच्छा दबक्या आवाजात ऐकण्यास मिळाली.
0 Comments